महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जनता कर्फ्यू : मुकेश अंबानी यांनी घंटा नाद करत व्यक्त केली कृतज्ञता

देशभरामधून आज जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनीदेखील सहभाग घेतला.

By

Published : Mar 22, 2020, 11:36 PM IST

Mukesh Ambani express gratitude to those providing essential services
Mukesh Ambani express gratitude to those providing essential services

नवी दिल्ली - देशभरामधून आज जनता कर्फ्यूला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनीदेखील सहभाग घेतला. टाळ्या-थाळ्या वाजवून मुकेश अंबानी यांनी कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावातसुद्धा आवश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.

वास्तविक, कोरोना विषाणू टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. पण डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकारांना हे शक्य नाही. या व्यवसायांशी संबंधित लोक कोरोना विषाणूच्या धोक्यात असतानाही आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना पाच मिनिटांसाठी टाळ्या, घंटा आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधान मोदींचे हे आवाहन संपूर्ण देशाने फार गांभिर्याने घेतले. २२ मार्चच्या संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास, देशातील कानाकोपऱ्यातुन लोक घराबाहेर पडले, त्यांच्या बाल्कनीत, छतावर येऊन घंटा आणि थाळ्या वाजवत आवश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले.

देशामध्ये कोरोनाने दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 396 वर पोहचली आहे. तर कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 कोरोनामधून बरे झाले असे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details