मुंबई- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) बुधवारी मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या अश्वमेध आणि शिवनेरी वातानुकुलित बससेवेचे दर घटवले आहेत. ओला आणि उबरच्या वाढत्या स्पर्धेमुळे महामंडळाने दर घटवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-पुणे मार्गावर ओला उबरच्या वाढत्या स्पर्धेमुळे अश्वमेधसह शिवनेरीचे दर घटले
दरकपात जवळपास ८० ते १२० रुपयांपर्यंत असणार आहे. याची अंमलबजावणी ८ जुलैपासून होणार आहे.
अश्वमेध आणि शिवनेरीची प्रवासीसंख्या वाढवण्यासाठी दर कपातीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. महामंडळाने दरकपातीच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. ही दरकपात जवळपास ८० ते १२० रुपयांपर्यंत असणार आहे. याची अंमलबजावणी ८ जुलैपासून होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवाशांना आता कमी पैशात वातानुकुलित बससेवेचा लाभ मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी महामंडळाच्या बससेवेपेक्षा ओला आणि उबरला पसंती देत आहेत. वातानुकुलित बससेवा पुरवणाऱ्या अश्वमेध आणि शिवनेरीचे दर हे जवळपास ओला आणि उबर इतकेच पडतात. त्यामुळे प्रवासी ओला आणि उबरसारख्या खासगी सेवेला प्राधान्य देत आहेत. यामुळे शिवनेरी आणि अश्वमेधची प्रवासीसंख्या कमी झाली होती.