मुंबई - विश्वकरंडकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावे लागल्याने अनेकांनी भारतीय संघावर टीका केली आहे. विशेषत: महेंद्रसिंह धोनीच्या 'एकेरी-दुहेरी'च्या फंड्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गेल्या काही सामन्यांतील संथ खेळीवरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेकजण त्याच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यातच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी महेंद्रसिंग धोनीला ट्विटरवरून निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.
निवृत्तीचा विचार मनातही घेऊ नको माही - लता मंगेशकर
गेल्या काही सामन्यांतील संथ खेळीवरून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, यामध्ये अनेकजण त्याच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. यातच ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी महेंद्रसिंग धोनीला निवृत्ती न घेण्याचा सल्ला दिला आहे.
ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, नमस्कार धोनीजी, आजकाल मी ऐकत आहे की तुम्ही निवृत्त होण्याचा विचार करत आहात. कृपया असा निर्णय घेऊ नका, देशाला तुमच्या खेळाची गरज आहे आणि माझीही विनंती आहे की, तुम्ही निवृत्ती विचारही मनात आणू नये. असे ट्विट करून त्यांनी पोस्ट महेंद्रसिंह धोनीलाही टॅग केली आहे.
त्याबरोबरच त्यांनी भारतीय संघालाही नाराज होऊ नका, असे दुसरे ट्विट करून सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे 'आकाश के उस पार भी' हे गाणे समर्पित केले आहे. हे गाणे गुलजार यांनी क्रिकेटसाठी लिहिले आहे.