महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान गप्प का..?, राहुल गांधींनी भारत-चीन प्रश्नावरुन केंद्राला धरले धारेवर - India China War

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत प्रधानमंत्री मोदी गप्प का..? का लपत आहात..?, असे प्रश्न उपस्थित केले आहे.

rahul gandhi
राहुल गांधी

By

Published : Jun 17, 2020, 10:34 AM IST

Updated : Jun 17, 2020, 12:49 PM IST

नई दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

बास.. आता खूप झाल! देशात जनतेला उत्तर द्या, नेमक काय झालं लडाखच्या सीमेवर?, चीनने आपल्या भारतीय सैन्यातील जवानांना मारलेच कसे? चीनची हिंमतच कशी होते, भारतीय सीमेत घुसखोरी करुन कब्जा करण्याची?, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धारेवर धरले आहे.

दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी (दि. 15 जून) रात्री व मंगळवारी (दि. 16 जून) भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या मारहाणीत भारतीय सैन्य दलातील आणखी चार जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिनी सैन्य दलातीलही अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. वृतसंस्था एएनआयला सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा -''हुतात्मा जवानाबद्दलचे दु:ख शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नाही"

Last Updated : Jun 17, 2020, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details