महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 7:54 PM IST

ETV Bharat / bharat

'लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा द्यावी!'

लव्ह जिहाद प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा फारच कमी आहे. लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यायला हवी, असे मत भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह
खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ -सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी पुन्हा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. लव्ह जिहाद करणाऱ्यांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यायला हवी, असे त्या म्हणाल्या आहेत. लव्ह जिहाद प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा फारच कमी आहे. लव्ह जिहादमध्ये मोठ्या प्रमाणात फंडिंग होते. याची संपूर्ण तपासणी व्हायला हवी. याचबरोबर संसदेतही कायदा करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.

लव्ह जिहादवर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया

लव्ह जिहाद करणाऱ्यांना इतर देशांमधून मोठ्या प्रमाणात फंडिंग होते. त्यामुळे साध्या-सरळ स्वभावाच्या मुलींच्या त्यांच्या जाळ्यात फसतात. यासाठी सरकारने फंडिंग प्रकरणी चौकशी करायला हवी. लव्ह जिहादवर एक डाटा जमा करून त्यासाठी संसेदत कायदा करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे एक षडयंत्र आहे. लव्ह जिहादप्रमाणेच दहशतवादाला फंडिंग केले जाते. मध्य प्रदेशामध्ये लव्ह जिहादचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2020 -

राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची मंजुरी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशात 'बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायदा 2020' लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा अध्यादेश मंजूर करण्यात आला होता. फसव्या मार्गाने किंवा लग्नाद्वारे एखाद्या व्यक्तीचे सक्तीने धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे. नव्या कायद्यानुसार सामूहिक धर्मांतर केल्यानंतर तीन ते 10 वर्षे तुरुंगवासही होऊ शकतो. किमान 50 हजार रुपये दंडही भरावा लागेल.

ABOUT THE AUTHOR

...view details