भोपाळ -मध्यप्रदेशात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याऱ्या जमावातील 7 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना संशयिताची तपासणी करण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यावर इंदोर शहरातील तटपट्टी भखला परिसरातील नागरिकांनी दगडफेक केली होती. त्यामुळे घाबरलेले आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला होता.
इंदोर पोलिसांनी आत्तापर्यंत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून 7 जणांना अटक केली आहे.
काय घडली होती घटना?
इंदोर शहरातील तटपट्टी भखला परिसरात आरोग्य कर्मचारी आणि प्रशासकिय अधिकारी कोरोना संशयिताची तपासणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता. जमावाने संशयिताची तपासणी करण्यास विरोध करत आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 7 जणांना अटक केली आहे.
इंदौर येथील प्रशासनाने रानीपुरा, टाट पट्टी बाखल, चंदन नगर, आजाद नगर, खजराना, मुंबई बाजार सह सहा ठिकाणाला कोरोना अतिसंवेदनशील परिसर म्हणून घोषित केले आहे. येथील संशयित लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी रुग्णालयात नेले जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा डॉक्टरांवर राग आहे.