भोपाळ - मध्य प्रदेशातील बीना टाऊन येथील शासकीय रुग्णालयात काहीसा विचित्र प्रकार घडला. येथे एका ७२ वर्षीय रुग्णाला डॉक्टरांनी रात्री मृत घोषित केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी तो चक्क उठून रडू लागला! गुरुवारी रात्री मृत घोषित केलेली व्यक्ती शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी नेले जात असताना जिवंत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर डॉक्टरांची धावाधाव सुरू झाली.
रात्री डॉक्टरांनी 'त्याला' मृत घोषित केले, अन् दुसऱ्या दिवशी... - morgue
या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा लगेचच उपचार सुरू करण्यात आले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. कदाचित रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती.
या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा लगेचच उपचार सुरू करण्यात आले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. कदाचित रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती. या वृद्धाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता पोलिसांना कळवली होती. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी वृद्धाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतक्यात, तो रुग्ण जागा झाला आणि रडू लागला. हे पाहून डॉक्टरांची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू केले, पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.