LIVE:
- आज झालेल्या घटनांमुळे चिंता करण्याचे कारण नाही, आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. तसेच, आमचे सरकार हे पाच वर्ष टिकून राहील, असे मत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.
- मध्यप्रदेशातील बाकी काँग्रेस आमदारांना राजस्थानला नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याआधी महाराष्ट्रातही सत्तास्थापनेच्या गोंधळादरम्यान काँग्रेस आमदारांना जयपूरला नेण्यात आले होते.
- ज्योतिरादित्य सिंधिया आज भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. मात्र, त्यांचा भाजप प्रवेश लांबणीवर पडला आहे. दिल्लीऐवजी ते आता भोपाळमध्येच १२ मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे.
- भाजप मुख्यालय दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा भाजप मुख्यालयात दाखल
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.
- ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या दिल्लीतील निवास्थानी दाखल झाले आहेत.
- काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर आता ज्योतिरादित्य सिंधिया हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करतील. आज सायंकाळी सहाच्या सुमारास याची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
- आमचे सरकार टिकणार असून, लवकरच तुम्हाला कमलनाथ यांचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळेल, असे काँग्रेस नेते पी. सी. शर्मांनी म्हटले आहे. सरकार टिकवण्यासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ आपल्याकडे आहे का? असे विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले.
- कर्नाटकातील १९ आमदारांचे राजीनामे घेऊन भूपेंद्र सिंह हे भोपाळला पोहोचले. भरपूर आमदारांना भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या ३० वर पोहोचू शकते, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
- काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि हरिश रावत हे दिल्लीतील १० जनपथ येथे पोहोचले आहेत. काँग्रेस अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीला आसाम काँग्रेस प्रमुख रिपुन बोराही उपस्थित आहेत.
- गुजरात काँग्रेसमध्ये कोणताही बेबनाव नाही, पक्षाची स्थिती स्थिर - परेश धनानी (गुजरात विधानसभा विरोधी पक्षनेते)
- महत्त्वाच्या बैठकीसाठी काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत.
- राज्याचे माजी गृहमंत्री भूपेंद्र सिंह हे १९ आमदारांचे राजीनामे घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. ते विशेष विमानाने बंगळुरूहून भोपाळला आले आहेत.
- अडल सिंह यांच्या राजीनाम्यानंतर हाटपिपलियाचे काँग्रेस आमदार मनोज चौधरी यांनीही आपला राजीनामा दिल्याचे सूत्रांकडून समजत आहे.
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमावलीचे काँग्रेस आमदार अडल सिंह कांसाना यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे.
- कमलनाथ यांना पैसे दिलेले नेते आता त्यांना पैसे परत मागत आहेत - विजयवर्गीय
भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पैसे देऊन मंत्रिपद मिळवलेले नेते आता त्यांना आपले पैसे परत मागण्याच्या तयारीत आहेत. कारण आपली सत्ता आता राहील की नाही याची त्यांना शंका वाटत आहे, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे.
- भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी सप आणि बसपच्या आमदारांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसून, केवळ होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचे शिवराज यांनी स्पष्ट केले.
- कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये असणाऱ्या १९ काँग्रेस आमदारांनी कर्नाटकच्या डीजीपींना पत्र लिहित, आपल्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. आम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी स्वेच्छेने कर्नाटकात आलो असून, त्यासंबंधी आम्हाला संरक्षणाची गरज आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
- ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या सहा मंत्र्यांसह १९ जणांचा राजीनामा
- कर्नाटकातील बंगळुरू येथील रिसॉर्टमध्ये असेलल्या काँग्रेसच्या १९ आमदारांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. यामध्ये सहा राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
- ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये होते तेव्हा महाराजा, आणि आता पक्ष सोडल्यानंतर माफिया असे काही काँग्रेस नेते म्हणत आहेत. हा काँग्रेस नेत्यांचा दुटप्पीपणा आहे. - माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान
- पंतप्रधान मोदींची भेट घेवून सिंधिया आपल्या निवासस्थानी परतले.
- ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेसने केली पक्षातून हकालपट्टी, के. सी वेनुगोपाल यांची माहिती