भोपाळ - मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर 10 दिवस सुट्टीवर गेले आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आपल्या गावी ते आज (मंगळवार) गेले आहेत. मध्यप्रदेशात तीन राज्यसभा जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
मध्यप्रदेशचे राज्यपाल दहा दिवसांच्या सुट्टीवर; राज्यसभा निवडणुकीला परतणार माघारी
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि फूल सिंग बरिया यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. तर भाजप ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेर सिंग सोलंकी यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहे.
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि फूल सिंग बरिया यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. तर भाजप ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुमेर सिंग सोलंकी यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहे.
राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकारचे मंत्रीमंडळ विस्ताराचे कामही कोरोनामुऴे खोळंबून पडले आहे. 23 मार्चला शिवराज सिंग चौहान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. एप्रिल महिन्यात पाच आमदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. यामध्ये सिंधिया यांचे जवळचे सिंधिया तुलसी सिलावत आणि गोविंद सिंग राजपूत यांचा समावेश आहे.