महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन; लखनऊच्या मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती.

mp governor lalji tondon
लालजी टंडन

By

Published : Jul 21, 2020, 7:36 AM IST

Updated : Jul 21, 2020, 8:16 AM IST

लखनऊ (उत्तर प्रदेश) -मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. लखनऊच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टंडन यांना 11 जूनला मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यानंतर 15 जूनला त्यांची प्रकृती आणखी खराब झाली. पोटात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांच्यावर शस्तक्रियादेखील करण्यात आली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज त्यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.

मुळ स्वरुपात उत्तरप्रदेशच्या राजकारणात सक्रिय राहणाऱ्या लालजी टंडन भाजप सरकारमध्ये मंत्री होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जवळच्या व्यक्तिंपैकी ते एक होते. ते उत्तरप्रदेशच्या लखनऊ मतदारसंघातून खासदारही होते. टंडन हे मागच्या पिढीचे दिग्गज नेते होते. वयाच्या 12 व्या वर्षीच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडले गेले होते.

त्यांच्या प्रवासावर एक नजर -

  • 12 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कामाला सुरूवात
  • 1960 मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात
  • जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सहभाग
  • दोन वेळा विधानपरिषद सदस्य
  • 1996 ते 2009 पर्यंत तीन वेळा विधानसभा सदस्य
  • कल्याण सिंह यांच्या नेतृत्वात युपी सरकारमध्ये मंत्री
  • युपी विधानसभेत विरोधी पक्षनेता
  • लखनऊ लोकसभा मतदानसंघातून 2009 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकलीही
  • 21 ऑगस्ट 2018 ला टंडन यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती
  • 20 जुलै 2019 मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी
Last Updated : Jul 21, 2020, 8:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details