भोपाळ -मध्य प्रदेशच्या निवाडीमध्ये पाच वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडला आहे. हा बोअरवेल 200 फूट खोल आहे. घटनेबद्दल समजताच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये पडला ५ वर्षीय मुलगा, बचावासाठी प्रयत्न सुरू - child falls in borewell in MP
मध्य प्रदेश निवाडीमध्ये पाच वर्षीय मुलगा 200 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
उत्तर प्रदेश
यापूर्वीही अशाच घटना समोर आल्या आहेत. 28 मे रोजी बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडली होती. चिमुकल्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था एनडीआरएफकडून करण्यात आली होती. मात्र या चिमुकल्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती. तसेच 21 फेब्रुवरी 2019 ला पुण्यातील मंचर येथे 200 फूट बोअरवेलमध्ये एक मुलगा पडला होता. तब्बल 15 तास प्रयत्न केल्यानंतर मुलाला बोअरवेलबाहेर सुखरूपकाढण्यात आले होते.