महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे निधन; गोंदियात होणार अंत्यसंस्कार

मुख्यमंत्र्यांचे सासरे घनश्यामदास मसानी हे ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला देवी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे. घनश्यामदास मसानी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३२ ला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात झाला होता. त्यांचे पार्थिव आज गोंदियाला आणण्यात येणार आहे. गोंदियातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

MP CM Shivraj singh cahuhan's Father in law passes away
शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे निधन; भोपाळच्या नॅशनल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..

By

Published : Nov 19, 2020, 8:38 AM IST

Updated : Nov 19, 2020, 10:29 AM IST

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे बुधवारी निधन झाले. भोपाळमधील नॅशनल हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी साधना सिंह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्यासोबत अन्य नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे सासरे घनश्यामदास मसानी हे ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला देवी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे.

शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे निधन; भोपाळच्या नॅशनल रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास..

सिंधिया-मिश्रांनी व्यक्त केला शोक..

भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया, आणि राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ, आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती देओ अशा आशयाचे ट्विट यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात होणार अंत्यसंस्कार..

घनश्यामदास मसानी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३२ला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने भोपाळमध्ये निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव आज गोंदियाला आणण्यात येणार आहे. गोंदियातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

एअर अ‌ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून शिवराज सिंह चौहान, साधना सिंह चौहान आणि इतर कुटुंबीयांसोबत मसानी यांचे पार्थिव आज गोंदियात आणण्यात येईल. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते बिर्सी विमानतळावर येतील. तसेच, दुपारी तीनच्या सुमारास मसानी यांच्या गोंदियातील घरातून गोरेलाल चौक, मुख्य बाजारपेठ अशी त्यांची अंत्ययात्रा असणार आहे.

हेही वाचा :अजित पवारांच्या 'या' वक्तव्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध

Last Updated : Nov 19, 2020, 10:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details