भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उजव्या हातावरील बोटावर शनिवारी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, भोपाळमधील 'हमिदिया' या सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया झाली. त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. या शस्त्रक्रियेसाठी दिल्लीहूनही डॉक्टरांना बोलावण्यात आले होते.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया - hamidia hospital
कमलनाथ यांनी व्हीआयपी व्यक्तींप्रमाणे परदेशात किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करून न घेता, अतिसामान्य वर्गातल्या लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या शासकीय रुग्णालयातून ती करून घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच, त्यांचे कौतुकही झाले.
कमलनाथ यांनी व्हीआयपी व्यक्तींप्रमाणे परदेशात किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करून न घेता, अतिसामान्य वर्गातल्या लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या शासकीय रुग्णालयातून ती करून घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसेच, त्यांचे कौतुकही झाले. शस्त्रक्रियेआधी कमलनाथ यांनी या शासकीय रुग्णालयातील अन्य रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना येण्या-जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोणाचीही गैरसोय होऊ नये, याचीही दक्षता घेण्यास सांगितले होते.
आता त्यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शनिवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. काही तासांसाठी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती गांधी मेडिकल कॉलेजचे डीन अरुणा कुमार यांनी दिली.