महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश सत्तापेच: 'आमच्या आमदारांना ओलिस ठेवलंय, सरकार 'हायजॅक' करण्याचा भाजपचा प्रयत्न' - मध्यप्रदेश सत्तापेच

दिग्विजय सिंह यांना कर्नाटकात थांबललेल्या आमदारांना भेटू न दिल्यामुळे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपवर सरकार हायजॅक करत असल्याचा आरोप केला.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

By

Published : Mar 18, 2020, 3:00 PM IST

भोपाळ - काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आज कर्नाटकात बंडखोर आमदारांना भेटण्यास गेले होते. मात्र, त्यांना भेट घेण्यापासून पोलिसांनी अडवत ताब्यात घेतले होते. यावर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दिग्विजय सिंह काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य आहेत. आमदारांना भेटण्यासाठी ते गेले होते. मात्र, सुरक्षेचे कारण देण्यात आले. ५०० कर्नाटक पोलीस तैनात असताना ते आमदारांच्या सुरक्षेला धोका कसे असू शकतात. यातून असं दिसून येतयं की आमदारांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. आमचं सरकार 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार बंगळुरूतील रामदा हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांना भेटण्यास पोलिसांनी सिंह यांना रोखले. त्यामुळे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेथे सिंह उपोषणाला बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अमृताहळ्ळी पोलीस ठाण्यात त्यांना आणण्यात आले आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details