महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Plastic Ban: प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी 'भांड्यांची बँक', पाहा काय आहे अनोखा उपक्रम - बर्तन बँक

कार्यक्रमात प्लास्टिकच्या भांड्याचा वापर टाळण्याच्या उद्देशाने ही बँक सुरू केली आहे. यामुळे प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरणाच रक्षण होण्यास मदत होत आहे.

utensils bank
बॅन प्लास्टिक

By

Published : Jan 11, 2020, 1:25 PM IST

भोपाळ - प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी मध्यप्रदेशातील बैतूल शहरानं अनोखा उपक्रम राबवला आहे. शहराच्या महानगर पालिकेने 'बर्तन बँक' म्हणजेच भांड्यांची बँक सुरू केली आहे.

ही 'बर्तन बँक' कार्यक्रम आणि उत्सवांसाठी नागरिकांना भांडी भाड्यानं देते. ताट, वाट्या, चमचे असे सामान या बर्तन बँकेत ठेवण्यात आले आहे.

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी 'भांड्यांची बँक'
कार्यक्रमात प्लास्टिकच्या भांड्याचा वापर टाळण्याच्या उद्देशाने ही बँक सुरू केली आहे. यामुळे प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरणाच रक्षण होण्यास मदत होत आहे. कोणतेही शुल्क न आकारता बर्तन बँकेतील भांडी नागरिकांना वापरता येतात. फक्त अनामत रक्कम पालिकेकडे भरावी लागते. ही बर्तन बँक उभारण्यासाठी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक महिन्याचा पगार दिला आहे. तसेच नागरिकांनीही प्रति व्यक्ती १०० रुपये अशी मदत केली आहे. बर्तन बँकेत ३ हजार ताटे आणि इतर सामान आहे. नागरिक कार्यक्रमांसाठी ही भांडी घेवून जातात. या उपक्रमामुळे नागरिक प्लास्टिकचा वापरण्यापासून परावृत्त होतील, असा विश्वास महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details