नवी दिल्ली- मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. लोकनायक रुग्णालयात सोमवारी रुग्णांचा नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेचा निषेध म्हणून डॉक्टरांनी संप पुकारला आहे. डॉक्टरांच्या संपाचा फटका हजारो रुग्णांना बसणार आहे.
लोकनायक रुग्णालयाचे डॉक्टर सायकत जेना म्हणाले, मागील २ महिन्यात डॉक्टरांना मारहाण केल्याची ही चौथी घटना आहे. यासाठी आम्ही डॉक्टरांना सुरक्षित वातावरण पुरवण्याची मागणी केली होती. परंतु, या मागणीवर कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. या मुद्यावर प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे ओपीडी आणि आपत्कालीन सेवेवर परिणाम होणार आहे. डॉक्टरांच्या मागणीसाठी आमची सचिवांसोबत बैठक होणार आहे. बैठकीत सचिवांसोबत संपाबाबत चर्चा केली जाणार आहे.