भोपाळ- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांची टाळेबंदी करण्यात आली आहे. या दरम्यान लोकांना आपल्या घरातच रहावे लागत आहे. पण, हा संचारबंदीची वेळ महत्वाची आहे. या काळात घरातच राहणे गरजेचे आहे. देशातील प्रेरक वक्ता पल्लवी प्रकाश यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून काही असे टीप्स दिले की ज्यामुळे तुम्ही संचारबंदीच्या काळात घरात राहून स्वतःच्या परिवाराला उत्तम वेळ देऊ शकता.
मुलांसह जास्तीत जास्त वेळ घालवा
वक्त्या पल्लवी प्रकाश म्हणतात, लोकांचा वेळच जात नाही, अशी तक्रार आहे. आज प्रकृतीने तुम्हाला वेळ दिली आहे, जेव्हा सर्व पालक अपल्या मुलांसह जास्तीत जास्त वेळ घालवावा. कारण, ही मुलांसह वेळ घालविण्याची चांगली संधी आहे. ज्यामुळे तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये एक चांगले मैत्रीपूर्ण संबंध तयार होतील.
आपल्या नातेवाईक आणि मित्रांशी बोला
पल्लवी प्रकाश सांगतात, संचारबंदीमुळे सोशल डिस्टेसिंग ठेवत घरातून बाहेर न पडत नाही. पण, टेक्नॉलॉजीच्या या जमान्यात ही एक चांगली संधी आहे की, आपण जास्तीत गप्पा मारु शकू. तुम्ही तुमच्या सर्व नातेवाईकांशी आणि मित्रांशी गप्पा मारुन संबंध चांगले ठेवू शकतो.