दिल्ली - येथे एका आईने स्वत:च्याच 15 वर्षीय मुलीला देह व्यापार करण्यासाठी विकल्याचा प्रकार घडला होता. त्या मुलीची दिल्ली महिला आयोगाने सुटका केली आहे. या मुलीला विकल्यानंतर तिने कसेबसे तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये ती यशस्वी देखील झाली. यानंतर तिने दिल्ली महिला आयोगाच्या हेल्पलाईन क्रमांक 181 वर संपर्क करुन तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली.
आईनेच 1 लाखासाठी पोटच्या मुलीला विकले, दिल्ली महिला आयोगाने केली सुटका हेही वाचा -हिंगोलीत वऱ्हाडाचा टेम्पो झाडाला धडकला, ३० मुले जखमी
अल्पवयीन मुलीने दिल्ली महिला आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, ती बवाना येथील जेजे कॉलनी येथे आपले सावत्र वडील आणि बहिण भावडांसोबत राहत होती. एक दिवशी तिच्या आईने तिला बदरपूर येथील बहिणीच्या घरी जाण्याचा बहाणा केला. मात्र, ती मुलीला रस्त्यातच निजामुद्दीन येथील हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिथे तिने 1 लाख रुपयांना तिची विक्री केली.
हेही वाचा -वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर
पीडित मुलीची खरेदी करणाऱ्या व्यक्तीने तिला बवाना येथील ईश्वर कॉलनी या ठिकाणी आणले. त्यानंतर त्याठिकाणी तिला 62 वर्षीय व्यक्तीसोबत जबरदस्ती लग्न करण्यासाठी दबाव आणला असता तिने तेथून कसाबसा पळ काढला. यानंतर तिने राज्य महिला आयोगाच्या महिला हेल्पलाईन क्र. 181 वर संपर्क केला आणि तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यांनतर आयोगाने या मुलीला स्थानिक पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता, पोलिसांनी सदर प्रकरणाची तक्रार दाखल केली. यानंतर मुलीला आश्रय गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. तर पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही.
हेही वाचा -'नोकऱ्या भरपूर, योग्य उमेदवार नाहीत', भाजप मंत्र्याच्या वक्तव्यावर मायावती, प्रियांकांची टीका
दिल्ली पोलिस अपयशी - स्वाती मालीवाल
दिल्लीमध्ये अशा तस्करीच्या घटना सर्रासपणे सुरू आहेत. मात्र, तरीदेखील दिल्ली पोलीस अशा घटनांवर अंकुश लावण्यामध्ये अपयशी ठरले आहेत, असा आरोप दिल्ली महिला पोलीस आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी केला. तर या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.