पाटना - कोरोना महामारामुळे संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरू आहे. उद्योगधंदे, व्यापार बाजारपेठा बंद असल्याने सगळ्याच देशावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातही हातवर पोट असणाऱ्या नागरिकांचे जास्त हाल होत आहेत. देशभरातून दररोज मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. बिहारमधील समस्तीपूर येथून लहान मुलाला घेवून केळी विकणाऱ्या महिलेची कहानी समोर आली आहे.
जिल्ह्यातील रोसडा परिसरातमध्ये एक महिला रस्त्यावर केळी विकत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे लहान मुलाला ती बरोबर ठेवू शकत नाही. पोलिसांचीही भीती सतत तिच्या मनात आहे. जर मुलाला बरोबर पाहिले तर पोलीस केळी विकू देणार नाही, म्हणून या महिलेने मुलाला कॅरेटमध्ये लपवून ठेवले.
एकट्या मुलाला कुठं सोडू साहेब
या महिलेचा पती मजूरी करण्यासाठी परराज्यात गेलेला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे तो तिकडेच अडकून पडला आहे. मी एकटीच असल्यामुळे मुलाला घरी कोणाच्या भरोश्यावर सोडू, असे तिने उत्तर दिले. घरात पैशांची अडचण आहे, म्हणून मी केळी विकायला सुरुवात केली आहे. हे काम धोक्याच आहे, पण उदनिर्वाह करण्यासाठी कराव लागत आहे, असे ती म्हणाली.
लॉकडाऊमुळे पतीचं काम बंद झालं आहे. त्यामुळे ते घरी पैसे पाठवत नाहीत. अशा परिस्थितीत घर चालवण कठीण झालयं. त्यामुळे फळे विकण्याचा निर्णय घेतल्याचे महिलेने सांगितले. थोड्या वेळाने पोलीसही तेथे आले होते. त्यांनी मुलाला घरी ठेवण्यास सांगितले. मात्र, मुलाला कोण्याच्या भरोश्यावर घरी ठेवायचे हा प्रश्न तिच्यासमोर आहे. तसेच केळी विकल्या नाही तर मुलाचे पोट कसे भरणार हा प्रश्न तिला सतावत आहे.