नवी दिल्ली -नोएडामधील एका खासगी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांनाच ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे दंड म्हणून व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना 2 तास ओलीस ठेवल्याची माहिती आहे.
...म्हणून शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांनाच 2 तास ठेवले ओलीस - Mortgage of children in noida
नोएडामधील एका खाजगी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे.
शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थ्यांनाच 2 तास ठेवले ओलीस
दरम्यान, हा प्रकार पालकांना कळाल्यानंतर पालकांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून याविरोधात शाळेबाहेर घोषणाबाजी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत पालक आणि शाळा व्यवस्थपकांना समजावण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापकाने माफी मागितल्यानंतर पालक शांत झाले. दरम्यान, याप्रकरणी शाळा व्यवस्थापकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.
हेही वाचा -'न्यायाधीश एस. मुरलीधर यांची बदली ही कॉलेजियमच्या शिफारसीवर'