महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रेल्वेच्या बुक केलेल्या तिकीट रद्द करण्यास प्रवाशांचा कल - भारतीय रेल्वे

१ जूनपासून भारतीय रेल्वे २०० गाड्या सोडणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या अॅपवरून तुम्ही तिकीट बुक करू शकता.

indian railway
रेल्वेच्या बूक केलेल्या तिकीट रद्द करण्यास प्रवाशांचा कल

By

Published : May 31, 2020, 7:20 PM IST

नोएडा - २२ मेपासून भारतीय रेल्वेने ट्रेनची तिकिटे बुकींग किंवा रद्द करण्याची सुविधा सुरू केली आहे.

स्थानिक लोकांच्या गरजेनुसार तिकीट बुकिंग किंवा रद्द करण्यासाठी आरक्षण काऊंटर सुरू करण्याबाबत सूचना क्षेत्रीय रेल्वेला देण्यात आल्या आहेत. नोएडाच्या सेक्टर ३३च्या काऊंटरवर काही लोक तिकीट बुक करायला आले होते. तर त्यापेक्षा जास्त लोक हे तिकीट रद्द करण्यासाठी आले होते, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.‍

मिळालेल्या माहितीनुसार, ८ लाख ४७ हजारांची तिकिटे बुक करण्यात आली. तर १६ लाख ७३ हजारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहे. तर, रद्द केलेली तिकिटे लॉकडाऊनच्या आधीच बुक केली होती, असे प्रवाशांनी ईटीव्ही भारतला सांगितले.

मुख्य आरक्षण पर्यवेक्षक सुरेशचंद त्यागी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक तिकिटे रद्द करण्यासाठी येत आहेत. १ जूनपासून भारतीय रेल्वे २०० गाड्या सोडणार आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या अॅपवरून तुम्ही तिकिट बुक करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details