नवी दिल्ली- चंद्रापासून २ .१ किमी दूर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. मात्र, चांद्रयान २ मोहीम ९० ते ९५ टक्के फत्ते झाल्याचे सरकारने म्हटले आहे. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरतच असून त्याद्वारे चंद्राबद्दल वैज्ञानिक माहिती जाणून घेण्यास मदत होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. तर विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास १४ दिवसांता कालावधी लागू शकतो, असे इस्त्रोचे प्रमुख के. सिवान म्हणाले.
याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या विज्ञान विषयक सल्लागार के. विजय राघवन यांनी दिली. चांद्रयान २ मोहीम यशस्वी होण्याचे टप्पे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार ९० ते ९५ टक्के मोहीम यशस्वी झाल्याचे राघवन म्हणाले. या मोहिमेमध्ये इस्त्रोद्वारे अनेक नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. त्यांची कार्यक्षमाताही सिद्ध झाली. ही मोहीम खूप क्लिष्ट प्रकारामधील होती. शेवटच्या काही मिनिटापर्यंत सर्वकाही ठीक चालले होते. मात्र, २ किलोमीटरचे अंतर राहिले असताना संपर्क तुटला.