कोरोना व्हायरस: केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिक निरिक्षणाखाली
केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधून माघारी आलेल्या नागरिकांनी २८ दिवस आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी सांगितले आहे.
संग्रहित छायाचित्र
तिरूवअनंतपुरम - कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले आहे. कोरोना व्हायरस जगभर पसरण्याची भीती असतानाच केरळमध्ये २ हजार ४२१ नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. चीनमधून माघारी आलेल्या नागरिकांनी २८ दिवस आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे केरळच्या आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी सांगितले आहे.