हैदराबाद - कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 18 हजार 522 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 418 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 16 हजार 475 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील 3 लाख 21 हजार 722 लोक कोरोनामुक्त झाले असून सध्या 2 लाख 15 हजार 125 जणांवर उपचार सुरू आहेत.
देशात तब्बल 18 हजारांहून अधिक नवे रुग्ण, बाधितांचा आकडा 5 लाख 48 हजार 318 वर - देशातील कोरोना रुग्ण
कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 18 हजार 522 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून 418 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
प्रातिनिधीक छायाचित्र
दरम्यान, राज्यात सोमवारी (दि. 29 जून) 5 हजार 257 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण बाधितांची संख्या आता 1 लाख 69 हजार 883 इतकी झाली आहे. सोमवारी 2 हजार 385 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून एकूण 88 हजार 960 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 73 हजार 298 इतक्या (ऍक्टिव्ह) रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -जम्मू काश्मीर : चकमकीत सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, शोध कार्य सुरू
Last Updated : Jun 30, 2020, 12:15 PM IST