चेन्नई - तामिळनाडू राज्यात आज एका दिवसात 106 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 हजार 75 झाली आहे. आज सापडलेल्या नव्या रुग्णांमधील 90 जण एकाच प्रकरणाशी संबंधित आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव बिला राजेश यांनी दिली.
राज्यात आत्तापर्यंत आढळलेल्या रुग्णांपैकी 971 रुग्ण एकाच प्रकरणाशी संबंधित आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.