नवी दिल्ली- देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकार व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून ऑगस्टमध्ये विधानसभेचे पावसाळी अधिवेशन घेण्यास तयार आहे. तथापि, अंतिम निर्णय येणे बाकी आहे. संबधित निर्णय राज्य सरकार आणि मुख्यमंत्री घेतील. ही माहिती सभापती हृदय नारायण दीक्षित यांनी रविवारी दिली.
आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे, लोक भवनमध्ये अधिवेशन घेणे. कारण, सर्व आमदारांना लोकभवनात बसण्यासाठी पुरेशी जागा आहे. आगामी अधिवेशन ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या 'हायब्रीड सेशन'सारखे करण्याचा विचार नसल्याचेही त्यांनी सांगितले.