महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेचे पावसाळी अधिवेशन : अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवरील चर्चेने सत्राची सुरुवात व्हावी; सुप्रिया सुळेंचे मत - संसद पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Monsoon session of Parliament LIVE updates
संसदेचे पावसाळी अधिवेशन

By

Published : Sep 14, 2020, 9:58 AM IST

Updated : Sep 14, 2020, 1:32 PM IST

13:31 September 14

उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

11:21 September 14

देशासमोरील सर्वात मोठे आव्हान हे अर्थव्यवस्था आणि बेरोजगारी - सुप्रिया सुळे

सध्या देशासमोरील सर्वात मोठे आव्हान हे कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेची स्थिती आणि बेरोजगारी आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण त्याबाबत चर्चा करावी असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले. जगातील सर्वच देश या समस्येतून जात आहेत. आपल्या सरकारने या समस्यांना प्राधान्य द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचेही सुळे यावेळी म्हणाल्या.

11:18 September 14

देशाच्या भावी डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे - टी. आर. बाळू

द्रमुक खासदार टी. आर. बाळू यांनी लोकसभेमध्ये नीट परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्त्यांचा मुद्दा मांडला. राज्याच्या बोर्डातून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ दोन महिन्यांमध्ये सीबीएसई बोर्डाच्या नीट परीक्षेसाठी तयारी करावी लागते. त्यामुळे दबावात आणि तणावाखाली येऊन विद्यार्थी आत्महत्या करतात, असे ते म्हणाले. 

11:15 September 14

आम्ही चर्चेपासून पळत नाहीये - प्रल्हाद जोशी

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यावरुन सरकारवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रल्हाद जोशी म्हणाले, की कोरोना परिस्थितीबाबत सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. या कठीण परिस्थितीमध्येही आपण ८००-८५० खासदार एकत्र आलो आहोत. सरकारला प्रश्न विचारण्याचे इतर मार्गही आहेत, सरकार चर्चेपासून दूर पळत नाहीये.

10:24 September 14

लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात..

09:30 September 14

लोकसभेचे कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आले आहे.

09:27 September 14

प्रणव मुखर्जी, अजित जोगी, लालजी टंडन यांसह इतरांना वाहिली श्रद्धांजली..

लोकसभेचे सत्र सुरू झाल्यानंतर दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शास्त्रीय गायक पंडित जसराज, छत्तीसगडचे दिवंगत मुख्यमंत्री अजित जोगी, मध्य प्रदेशचे दिवंगत राज्यपाल लालजी टंडन, उत्तर प्रदेशचे दिवंगत मंत्री कमल रानी आणि चेतन चौहान तसेच यावर्षी निधन झालेल्या सर्व नेत्यांना आणि महान व्यक्तींना खासदारांनी श्रद्धांजली वाहिली.

09:25 September 14

विविध पक्षांनी दिला स्थगन प्रस्ताव..

डीएमके आणि सीपीआय (एम) या पक्षांनी तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमुळे आत्महत्या केल्याविरोधात स्थगन प्रस्ताव दिला आहे. तर, आरएसपीच्या एन. प्रेमचंद यांनी दिल्ली दंगलीत मोठ्या नेत्यांच्या नावांचा समावेश केल्याप्रकरणी स्थगन प्रस्ताव दिला आहे.

09:23 September 14

काँग्रेस खासदारांनी दिला स्थगन प्रस्ताव

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे. चीनने लडाख सीमेवर केलेल्या घुसखोरीविरोधात हा स्थगन प्रस्ताव देण्यात आला आहे.

09:21 September 14

डीएमके खासदार टी. आर. बाळू आणि कनिमोळी यांचे आंदोलन

तामिळनाडूमध्ये नीट परीक्षेच्या भीतीने १२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे नीट परीक्षेविरोधात डीएमके संसदेबाहेर आंदोलन करत आहे.

09:20 September 14

संसदेचे पावसाळी अधिवेशन...

संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय सत्रानंतर 174 दिवसांच्या मोठ्या खंडानंतर आता संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अशा प्रकारचा प्रसंग अनेक दशकांमध्ये घडलेला नाही. संसदेच्या दोन सत्रांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त खंड असू नये, या घटनात्मक आदेशाचे पालन करण्यासाठी पावसाळी अधिवेशन घेण्यात येत आहे. 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत हे सत्र चालेल. या सत्रात एकही खंड नसेल आणि सत्र दोन सत्रामध्ये चालेल. सकाळी लोकसभा आणि दुपारी राज्यसभा असे कामकाज होईल.

Last Updated : Sep 14, 2020, 1:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details