नवी दिल्ली :संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेमध्ये भारत-चीन सीमा परिस्थितीचा आढावा सादर केला. सध्या आपण चर्चेतून सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने दोन्ही देशांच्या लष्करादरम्यान बैठका सुरू आहेत. शांततेच्या मार्गानेच यातून तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असे सिंह म्हणाले.
चीन बोलताना जरी भारताच्या मुद्द्यांना सहमती दर्शवत असला, तरी सीमेवर त्यांच्या सैनिकांची कृत्ये ही अगदी याच्या उलट आहेत. चीनी सैनिकांनी काही दिवसांपूर्वीच भारतीय जवानांना उकसवण्यासाठी गोळीबार केल्याची घटना घडली होती, ज्याला आपल्या सैन्याने प्रत्युत्तर दिले नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंहांच्या राज्यसभेतील भाषणामधील महत्त्वाचे मुद्दे..
- चीनने सीमेवर मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे. हे १९९३ आणि १९९६च्या द्विपक्षीय कराराच्या विरोधात आहे.
- आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांचा सन्मान आपण करत आहोत, मात्र चीन नाही.
- चीनने सीमाभागात मोठ्या प्रमाणात सैनिक आणि शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. याला प्रत्युत्तर, आणि खबरदारी म्हणून भारतानेही सीमाभागात सैनिक तैनात केले आहेत.
- सध्याच्या स्थितीमध्ये सीमेसंदर्भात काही संवेदनशील मुद्द्यांची माहिती मी राज्यसभेत देऊ शकत नाही. आशा आहे, की सभागृहातील लोक हे समजून घेतील.
- सध्या सर्वात ताज्या बैठकीमध्ये दोन्ही देशांनी आहे अशी परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
- देशाच्या ३८ हजार वर्ग किलोमीटर जमीनीवर चीनने ताबा घेतला आहे.
- अरुणाचलमधील ९० हजार वर्ग किलोमीटर जमीन आपली असल्याचा दावा चीनने केला आहे.
दरम्यान, यापूर्वी लोकसभेमध्येही राजनाथ सिंहांनी सीमेवरील परिस्थितीचा आढावा सादर केला होता. यावेळीही त्यांनी ही माहिती दिली होती. त्यानंतर, केंद्रीय गृह मंत्रालयाने भारत-चीन सीमेवरून यावर्षी घुसखोरीची एकही घटना घडली नसल्याचे म्हटले होते.
हेही वाचा :चीनची नवी खेळी? सीमेवर लाऊडस्पीकर लाऊन चीनी सैनिक वाजवतायत पंजाबी गाणी