महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी सोशल मीडियावरून संन्यास घेणार नाहीत...कारण - #SheInspiresUs campaign modi will give up social media account

महिला दिनी स्त्री शक्तीला मोदी आपले सोशल मीडिया खाते एक दिवसासाठी समर्पित करणार आहेत. या अभियानाला #SheInspiresUs ('शी इन्स्पायर्स अस') असे नाव देण्यात आले आहे.

#SheInspiresUs
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Mar 3, 2020, 2:50 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी काल(सोमवारी) स्वत:चे सोशल मीडिया अकाऊंटस् बंद करण्याबाबत विचार करत असल्याचे ट्विट केले होते. यामागचे गुपित मोदींनी आज ट्विट करत उघड केले आहे. येत्या महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्याला जगासमोर आणण्यासाठी एक अभियान राबवले जाणार आहे. महिला दिनी दिवशी मोदींची सोशल मीडिया खाती महिलांना चालवण्यास देणार आहेत, असे म्हणत मोदींनी अकाऊंट बंद करण्यामागील घोषणेचे कारण उघड केले आहे.

महिला दिनी स्त्री शक्तीला मोदी आपले सोशल मीडिया खाते एक दिवसासाठी समर्पित करणार आहेत. या अभियानाला #SheInspiresUs म्हणजेच 'ती आम्हाला प्रेरणा देते', असे नाव देण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत देशवासियांना महिला कर्तुत्वाच्या प्रेरणादायक कहाण्या शेअर करण्याचे आवाहन केले आहे. #SheInspiresUs टॅगखाली स्टोरी शेअर करण्याचे आवाहन त्यांनी महिलांसोबत सर्व देशवासियांना केले आहे. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासंबधीचा व्हिडिओही पोस्ट करू शकता? असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्या एन्ट्री निवडल्या जातील त्या एक दिवसासाठी मोदींचे खाते 'टेक ओव्हर' करतील, असे यामध्ये म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details