रायपूर- छत्तीसगडचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अमरजीत भगत यांनी चांद्रयान- २ मोहिमेवरून मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. कोरिया जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
आतापर्यंत मोदीजी केवळ दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे क्रेडिट घेत होते. दुसऱ्यांच्या कामाबद्दल स्वतःचे कौतुक करुन घेत होते. पहिल्यांदा चांद्रयान-२ लाँच करण्यासाठी गेले, मात्र तेही फेल झाले, अशा शब्दांमध्ये अमरजीत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : 'या' कारणाने लँडर विक्रमशी संपर्क तुटला, चांद्रयान-१ च्या संचालकांची मीमांसा
चांद्रयान-२ या महत्त्वाकांक्षी योजनेतील विक्रम लँडरची लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः बंगळुरुमधील इस्रोच्या मुख्यालयात उपस्थित होते. दुर्दैवाने चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर दूर असताना इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.
त्यानंतर, काल ऑर्बिटरला विक्रम लँडरची छायाचित्रे मिळवण्यात यश आल्याने, लँडरची स्थिती इस्रोच्या लक्षात आली आहे. इस्रो १४ दिवस लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहे. लँडर चंद्रावर कोसळल्यानंतरही सुस्थितीत असल्याचेही इस्रोने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : 'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो