नवी दिल्ली- कोरोनाचा कहर पाहता, आपापल्या आर्थिक लक्ष्यांपेक्षा नागरिकांना वाचवण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी सर्व देशांना केले. ते 'जी-२०' देशांना संबोधित करत होते.
कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. या पार्श्वभूमीवर जी-२० देशांची व्हर्च्युअल शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी नव्या आपत्ती व्यवस्थापन प्रोटोकॉलची कल्पना सुचवली. तसेच, जागतिक स्तरावर परिणामकारक औषधांच्या निर्मितीसाठी जागतिक आरोग्य संघटना गरजेची आहे, त्यामुळे अशा संस्थांची क्षमता वाढवण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.