नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या एका चाहत्याने त्यांच्या मूर्ती तयार केल्या आहेत. बिहारच्या मुजफ्फरपूर आमगोला येथील एका मूर्तिकारने मोदींच्या अनेक मूर्ती तयार केल्या आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे, तुम्ही यामध्ये पैसाही साठवू शकता.
मोदी साडी, मोदी मँगोनंतर आता आल्या मोदींच्या मूर्ती... - मोदी साडी
जय प्रकाश असे या मूर्तिकाराचे नाव असून ते मुजफ्फरपूर आमगोला येथील रहिवासी आहेत. देशात 22 मार्चला लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्यांनी मोदींच्या मूर्ती तयार करण्यास सुरवात केली. याचबरोबर त्यांनी ह्या मूर्ती पर्यायवरणपूरक पद्धतीने बनवल्या आहेत. यामध्ये फक्त मातीचा वापर केला असून प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यात आलेले नाही.

यापूर्वी मोदी साडीची मोठी क्रेझ आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचे प्रिंट असलेल्या साड्यांची विक्रीही चांगल्या प्रमाणात झाली होती. तसेच लोकसभा निवडणुकीआधी अक्षय कुमारसोबतच्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंबा त्यांना आवडत असल्याचे सांगितले होते. यानंतर अनेक फळांची नावे मोदींच्या नावावर ठेवण्यात आली होती.