अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी गुजरातमध्ये विविध योजनांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. गुजरातमधील शेतकऱ्यांसाठी मोदींनी किसान सूर्योदय योजनाचा शुभारंभ केला. जुनागढ जिल्ह्यातील गिरनार रोपवे आणि यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटरशी संलग्न पेडियाट्रिक हार्ट हॉस्पिटलचे उद्घाटनही केले. तसेच टेलि-कार्डियॉलॉजी या मोबाईल अॅप्लिकेशन लॉन्च केले.
किसान सूर्योदय योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 या वेळात वीज पुरवण्यात येईल. ही योजना गुजरात मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली आहे. 2023पर्यंत प्रसारण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी राज्य सरकारने 3500 कोटी रुपयांचे बजेट दिले आहे.
देशातील कार्डियॉलॉजीचे सर्वांत मोठे रुग्णालय -