चंदीगड - 'करतारपूर कॉरिडॉरमुळे आपल्यातील आणि गुरु नानक देव साहिब पवित्र धार्मिक स्थळातील अंतर संपलं आहे. असाहय्यपणे मागील ७० वर्षांपासून दुर्बीनीतून पवित्र स्थळाकडे पाहण्याची गरज नाही. ही संधी आपल्याला स्वांतत्र्याच्या ७० वर्षांनंतर मिळाली आहे, असे मोदी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सिरसा येथे आले असता म्हणाले. यावेळी त्यांनी काश्मीर मुदद्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली.
हेही वाचा -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात जातीयवाद निर्माण करतोय- शर्मिष्ठा मुखर्जी
१९४७ साली भारत पाकिस्तान फाळणीला जनता जबाबदार आहे का? भाविकांना फक्त ४ किमी दूर असलेल्या पवित्र स्थळापासून लांब ठेवणं चुकीचे आहे. काँग्रेसने हे अंतर संपवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्ष भारतीय संस्कृतीचा आदर करत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.