नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातीच्या 'ऑर्डर ऑफ झायेद' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मोदी हे 'ऑर्डर ऑफ झायेद'ने सन्मानित होणारे पहिले भारतीय आहेत. द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी प्रयत्न केल्याने युएईचे युवराज महम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधानांना या पुरस्काराने सन्मानित केले. नरेंद्र मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना २००७ साली, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना २०१८ साली या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनाही २००७ साली हा सन्मान मिळाला होता.
या सन्मानासाठी आपण नम्र असल्याचे मोदींनी म्हटले आहे. तसेच वैयक्तीत सन्मानापेक्षा हा देशाच्या सांस्कृतिक ठेव्याचा भाग असून, १३० कोटी भारतीयांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचे त्यांनी ट्वीट केले.
पुरस्काराची परंपरा...
यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने १९९५ पासून ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो. यूएईचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आल्याने हा सन्मान महत्त्वपूर्ण आहे. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर पंतप्रधानांच्या आखाती देशांच्या दौऱ्यात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. १९९५ मध्ये सर्वप्रथम जपानचे तत्कालीन युवराज नारूहीतो यांना हा सन्मान देण्यात आला होता.
पुरस्काराची पार्श्वभूमी...
विविध पातळीवर दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींना घेतलेल्या प्रयत्नांना हा पुरस्कार मिळाला असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. सत्तेत आल्यापासून पंतप्रधानांनी आत्तापर्यंत १० वेळा पश्चिमी आशियाई देशांना भेट दिली आहे. भारत व यूएई देशांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलाचा व्यापार होतो. याचसोबत वस्तू व सेवा क्षेत्रातील देवाणघेवाण ही मोठी आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी मध्ये उभारण्यात येणाऱ्या तेल शुध्दीकरण प्रकल्पात यूएईच्या अबुधाबी नॅशनल ऑइल को. या कंपनीचा २५ टक्के समभाग आहे. संबंधित प्रकल्पाची जवळपास ४४ बिलियन युएस डॉलर्स किंमत असून, तेलाच्या व्यवहारात डॉलरपेक्षा स्वदेशी चलनाचा वापर करण्याचा द्विपक्षीय करार झाला आहे. दोनही देशांमध्ये जवळपास ५२ बीलियन युएस डॉलर्सचा व्यापार होतो. तसेच भारतातील ओएनजीसी कंपनीला अबुधाबीतील एका तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यामध्ये १० टक्के समभाग यूएई सरकारने देऊ केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना मिळालेला हा सन्मान महत्त्वपूर्ण ठरतो.
नरेंद्र मोदींच्या नावावर 'हे' पुरस्कार...