महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत रशियातील सामरिक भागीदारी मजबूत करण्यावर मोदी-पुतिन यांचे मतैक्य

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांवर मोदी आणि पुतिन यांच्यात चर्चा झाली. तसेच भारत आणि रशियाच्या घट्ट मैत्रीची गरज व्यक्त केली.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jul 2, 2020, 6:55 PM IST

नवी दिल्ली - आशिया खंडातील देशांबरोबर आणि पॅसिफिक महासागरात चीनने आक्रमक धोरण स्वीकारल्यामुळे या परिसरात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वातावरणातच सामरीकदृष्या परस्पर संबंध आणखी मजबूत करण्यावर रशिया आणि भारताचे मतैक्य झाले. दोन्ही देशांमध्ये ही विशेष आणि खास भागीदारी असेल, असे पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतिन फोनवर बोलताना म्हणाले.

दुसरे महायुद्धात विजय मिळून 75 वर्ष झाली. त्याबद्दल आणि रशियातील राज्यघटना दुरुस्तीसंबधीचे मतदान यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मोदींनी पुतिन यांना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्या महायुद्धातील 75 व्या विजयानिमित्त रशियातील लाल चौकातील विजयी संचलनात भारतीय तुकडीने सहभाग घेतला होता. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्यक्रमाला हजर राहिले होते.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही देशांनी केलेल्या उपाययोजनांवर मोदी आणि पुतीन यांच्यात चर्चा झाली. तसेच भारत आणि रशियाच्या घट्ट मैत्रीची गरज व्यक्त केली. दोन्ही देशांतील संबध सुधारण्यासाठी वार्षीक द्विपक्षीय परिषद घेण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. कोरोनाच्या रुग्णांमध्ये जागतिक स्तरावर रशियाचा चौथा क्रमांक आहे, तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details