नवी दिल्ली - भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिसाईलमॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. वैज्ञानिकाच्या किंवा राष्ट्रपतीच्या रुपात एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रीय विकासात अमुल्य असे योगदान दिले आहे. हे योगदान देश विसरू शकत नाही, असे टि्वट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांची जयंती; पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिसाईलमॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यांची आज 88 वी जंयती आहे.
नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओही टि्वट केला आहे. यातून त्यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एपीजे अब्दुल कलाम हे एक असाधारण व्यक्ती होते. त्यांच्यापासून लाखो लोकांना प्रेरणा मिळत आली आहे, असेही मोदी म्हणाले.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर 1931 ला तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे जन्म झाला होता. त्यांची आज 88 वी जंयती आहे. अब्दुल कलाम यांचे संपुर्ण नाव अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.तर 27 जुलै 2015 रोजी आयआयएम- शिलाँग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना कलाम यांचे निधन झाले.