महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2020, 7:55 PM IST

ETV Bharat / bharat

'मोदींना देशातील घडामोडींची जराही फिकीर नाही, त्यांच्यासाठी त्यांची 'इमेज' महत्त्वाची'

पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात काय घडत आहे याविषयी जराही फिकीर नाही. त्यांना केवळ त्यांची 'इमेज' महत्त्वाची वाटते, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधानांना हे शेतकऱ्यांचे कायदे समजत नाहीत, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल यांनी केला. हे नवे कायदे शेतकरीवर्गाच्या हिताचे असतील तर मोदींनी शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याचे धाडस करून दाखवावे, या राज्यात येण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेस नेते राहुल गांधी न्यूज
काँग्रेस नेते राहुल गांधी न्यूज

पतियाळा - पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात काय घडत आहे याविषयी जराही फिकीर नाही. त्यांना केवळ त्यांची 'इमेज' महत्त्वाची वाटते, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. ते मंगळवारी पंजाबमध्ये नवीन शेतीकायद्यांविषयी बोलत होते.

राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या 'खेती बचाओ यात्रे'चा एक भाग म्हणून पंजाबमध्ये गेले होते. तेथे त्यांनी शेतीविषयक तीन नवीन कायद्यांचा निषेध करण्यासाठी अनेक ट्रॅक्टर रॅली केल्या.

हे नवे कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, असे प्रतिपादन केंद्राने केले आहे.

जनतेच्या आवाजाचे रक्षण करणार्‍या माध्यमांसह अनेक संस्था भाजपच्या नेतृत्वात केंद्राने ताब्यात घेतल्याचा दावा गांधी यांनी केला. 'मला मुक्त प्रेस आणि स्वतंत्र संस्था द्या, हे सरकार फार काळ टिकणार नाही,' असे गांधी म्हणाले.

हेही वाचा -बॉलिवूडच्या माध्यमातून पाकिस्तान भारतात ड्रग्ज 'नेटवर्क' बनवतेय , भाजपा खासदाराचा आरोप

पंतप्रधानांना हे शेतकऱ्यांचे कायदे समजत नाहीत, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल यांनी केला. हे नवे कायदे शेतकरीवर्गाच्या हिताचे असतील तर मोदींनी शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याचे धाडस करून दाखवावे, या राज्यात येण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले.

आज राहुल यांनी लडाखचा मुद्दाही उपस्थित केला. 'पंतप्रधान मोदींनी भारताची एक हजार दोन चौरस फूट जमीन हिसकावली आणि चीनच्या ताब्यात दिली. ते भारत मातेबद्दल बोलतात. मात्र, त्यांनी या भारत मातेचा तुकडा चीनला दिला, हे वास्तव आहे', असा भयंकर आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांनी पत्रकार परिषद बोलावून त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे, असे राहुल म्हणाले. 'पंतप्रधान अटल बोगद्याच्या उद्घाटनासाठी जातील. त्यांनी सर्व माध्यमांना काबीज केले आहे. त्यांच्याद्वारे ते स्वतःची 'प्रतिमा' जपत असतात. मात्र, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी थेट संवाद साधण्यास घाबरतात,' असे गांधी म्हणाले.

हेही वाचा -'एका आमदाराच्या निष्काळजीपणामुळे पंतप्रधान आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाचा धोका'

ABOUT THE AUTHOR

...view details