महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदींना स्वतःचे कुटुंब नाही आणि ते जनतेलाही स्वतःचे कुटुंबीय समजत नाहीत - ममता बॅनर्जी - cooch behar

'पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालसाठी एक कवडी तरी दिली आहे का? जो व्यक्ती अशा प्रकारचे मोठ-मोठे दावे करत आहे, त्यांनी बंगालकडे कधी ढुंकून तरी पाहिले आहे का, याचा विचार करावा,' असे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी

By

Published : Apr 8, 2019, 4:01 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूच बेहार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतर लगेचच सभा घेतली. येथील लोकांना संबोधित करताना त्यांना मोदींवर जोरदार टीका केली. 'आपण सर्वांनी भारतात वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक कुटुंबीयांप्रमाणे एकत्र नांदताना पाहिले आहे. मात्र, ते मोदींना कसे कळणार? त्यांना स्वतःचे कुटुंब नाही आणि ते जनतेलाही स्वतःचे कुटुंबीय समजत नाहीत,' असे ममता यांनी म्हटले आहे.

'पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालसाठी एक कवडी तरी दिली आहे का? जो व्यक्ती अशा प्रकारचे मोठ-मोठे दावे करत आहे, त्यांनी बंगालकडे कधी ढुंकून तरी पाहिले आहे का, याचा विचार करावा. ते ५ वर्षे परदेश दौऱ्यांमध्ये व्यग्र होते. त्यांनी इकडे यायाला फुरसतही नव्हती,' अशी टीका मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details