नवी दिल्ली - ऑनलाईन सर्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये मोदींना ७.२४ मिलियन वेळा सर्च करण्यात आले. तर, २०१९ मध्ये त्यांना केवळ १.८२ मिलियन वेळा सर्च करण्यात आले. यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑनलाईन सर्चमध्ये राहुल गांधी आहेत.
ऑनलाईन सर्चमध्ये मोदींच्या लोकप्रियतेत घट; राहुल गांधी आहेत 'या' क्रमांकावर - नरेंद्र मोदी
काँग्रस हा राजकीय पक्ष म्हणून डिसेंबर २०१८ नंतर ऑनलाईन सर्चमध्ये प्रकाशझोतात आला आहे. याबाबतचा सर्व्हे हा ऑनलाईन व्हिजीबिलिटी मॅनेजमेंटचा प्लॅटफॉर्म असलेल्या सेमरशने (एसईएमआरयुएसएच) प्रसिद्ध केला आहे.
काँग्रस हा राजकीय पक्ष म्हणून डिसेंबर २०१८ नंतर ऑनलाईन सर्चमध्ये प्रकाशझोतात आला आहे. याबाबतचा सर्व्हे हा ऑनलाईन व्हिजीबिलिटी मॅनेजमेंटचा प्लॅटफॉर्म असलेल्या सेमरशने (एसईएमआरयुएसएच) प्रसिद्ध केला आहे. राजकीय नेत्यांमध्ये राहुल गांधी यांना दुसऱ्या क्रमांकावर सर्च करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्याबाबत २०१९ मध्ये १.५ मिलियन वेळा सर्च करण्यात आले.
काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांची लोकप्रियता ही २०१८ ते २०१९ मध्ये सर्वात वेगाने वाढली आहे. मोदी हे फेसबुकवर सर्वात सक्रिय असलेले नेते आहेत. त्यांच्या प्रोफाईलच्या वाढीचा दर हा फेब्रुवारी २०१९ मध्ये आणि मार्च २०१९ मध्ये ६८.२२ टक्के राहिला आहे. सेमरशने ८ राजकीय नेत्यांबाबत करण्यात येणाऱ्या सर्चचा अभ्यास केला. यामध्ये जानेवारी २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यान गुगलवर करण्यात येणाऱ्या सर्चचा समावेश आहे.