गांधीनगर - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींनी आज पहिल्यांदाच गुजरातमध्ये जाऊन आईची भेट घेतली. गांधीनगर येथे निवासस्थानी त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले.
विराट विजयानंतर मोदींनी घेतली आईची भेट, कॅमेराही होता सोबत
आईला भेटायला गेल्यानंतर काढलेल्या फोटोंमुळे विरोधकांनी मोदींना ट्रोल केले होते. मात्र, त्याकडे मोदींनी लक्ष दिले नाही. आजही त्यांनी आईचे आशीर्वाद घेतानाचे फोटो प्रसिद्ध केले.
लोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच आपली जन्मभूमी गुजरातला पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावळी आयोजित सभेतून त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. यानंतर ते त्यांच्या आईला भेटण्यासाठी गांधीनगरकडे रवाना झाले. निवडणुकीदरम्यान मतदानासाठी गुजरातला आले असता त्यांनी आईची भेट घेतली होती. विजयानंतर आता ते पुन्हा एकदा आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. २०१४ च्या निवडणुकीवेळीही मोदी विजय मिळवल्यानंतर आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजराला गेले होते.
दरम्यान, आईला भेटायला गेल्यानंतर काढलेल्या फोटोंमुळे विरोधकांनी मोदींना ट्रोल केले होते. मात्र, त्याकडे मोदींना लक्ष दिले नाही. आजही त्यांनी आईचे आशीर्वाद घेतानाचे फोटो प्रसिद्ध केले.