पाटणा - छोटे मोदी म्हणून ओळखले जाणारे अभिनंदन पाठक हे बिहारमधून विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यांनी निवडणुकीसाठी हथुआ हा मतदारसंघ निवडला आहे. पाठक हे हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसत असल्याने नेहमी चर्चेत असतात.
पंतप्रधान मोदींचे हुबेहुब व्यक्तिमत्व असलेला 'हा' उमेदवार लढविणार बिहार विधासभा निवडणूक - Abhinandan Pathak Modi lookalike
अभिनंद पाठक हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते सध्या बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील सवान्ना गावात राहत आहेत.
पंतप्रधान यांच्यासारखे दिसत असल्याबद्दल अभिनंदन पाठक म्हणाले, हा फक्त योगायोग आहे. मोदी हे सत्तेपर्यंत पोहोचले आहेत. मात्र त्यांनी वचन पूर्ण केले नाही. आता, पाहू पुढे काय होणार आहे. गरिबांसाठी लढण्याकरिता मी राजकारणात आलो आहे.
पाठक हे मूळचे उत्तर प्रदेशमधील सहारणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते सध्या बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यातील सवान्ना गावात राहत आहेत. हथुआची निवडणूक ही २ नोव्हेंबरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दिसणाऱ्या पाठक यांना निवडणुकीत किती मते मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.