महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदीजी, आता आम्हाला काम करू द्या!

देशातील कोरोना मृत्युचा दर आता ३.२ टक्क्यांवर आहे, हे यश आहे. आता आम्ही आमच्या सर्व उर्जांचा ताळमेळ साधून, व्हेंटिलेटर हटवून भारत आणि त्याच्या वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेला त्याच्या स्वतःच्या जोरावर श्वास घेऊ द्यायला हवा. भारताला आता काम करण्यास सुरूवात केली पाहिजे, लाल, हिरवा किंवा नारंगी, त्याने काही फरक पडत नाही. विषाणु येथे रहाणारच आहे आणि आपल्याला त्याच्यबरोबर काम करण्याची तयारी करण्याची गरज आहे.

Modi ji, let us WORK!
मोदीजी, आता आम्हाला काम करू द्या!

By

Published : May 8, 2020, 2:58 PM IST

भारतीयांनो, तुम्ही भारताला कोरोनाविषाणुपासून दूर घेऊन जाण्यात तुमचे सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. देशातील कोरोना मृत्युचा दर आता ३.२ टक्क्यांवर आहे, हे यश आहे. आता आम्ही आमच्या सर्व उर्जांचा ताळमेळ साधून, व्हेंटिलेटर हटवून भारत आणि त्याच्या वैविध्यपूर्ण अर्थव्यवस्थेला त्याच्या स्वतःच्या जोरावर श्वास घेऊ द्यायला हवा. भारताला आता काम करण्यास सुरूवात केली पाहिजे, लाल, हिरवा किंवा नारंगी, त्याने काही फरक पडत नाही. विषाणु येथे रहाणारच आहे आणि आपल्याला त्याच्यबरोबर काम करण्याची तयारी करण्याची गरज आहे.

वैद्यकीय आघाडीवर भारताने चांगली कामगिरी केली आहे, हे आश्चर्यच आहे कारण भारतात रोगातून बरे होण्याचा दर सध्या ४२,५३३ रूग्णांपैकी २७.५ टक्के आहे आणि केवळ १३९१ रूग्ण मरण पावले आहेत.दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या मृतप्राय झाली आहे. विषाणुने जेवढे नुकसान केले नसते त्यापेक्षा जास्त नुकसान आपले संचारबंदीने केले आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या अलिकडच्या अहवालानुसार, ४० कोटी भारतीय कामगार गरिबीच्या खाईत लोटले जातील. आणि, नोबेल विजेते अर्थतज्ञ अभीजित बॅनर्जी भविष्यवाणी वर्तवतात की कोरोना विषाणुमुळे आमचा जीडीपी १० ते १५ टक्के इतक्या जोरदारपणे खाली घसरेल.

आपल्या घरी जाण्यासाठी अत्यंत असहाय्य होऊन मार्ग शोधणाऱ्या उपासमारी आणि अभावग्रस्ततेकडे झपाट्याने निघालेल्या हजारो कामगारांचा विचार करतो, तेव्हा ते चित्र आणखीच खराब होते. (आग्रा येथे एका माणसाला रस्त्यावर भटक्या कुत्र्यांबरोबर दूध काढतानाचे चित्र पाहिले की अजूनही हादरायला होते). आग्र्यासारख्या हॉटस्पॉटमध्ये आणि क्वारंटाईनच्या छावण्या लोकांनी भरून गेल्या असून अस्पृष्यांची नवी पिढी बनली आहे. जैविक राजकारणाचा उपयोग अखेरची आघाडी-आमच्या शरिरांचा ताबा घेण्यासाठी सरकारकडून केला जात आहे. पण आता ही गाठ फोडून आतील पू बाहेर काढण्याची वेळ आली आहे. जर आता अर्थव्यवस्था खुली झाली नाही तर, आपल्याला आणखी विचित्र वास्तवाचे साक्षी व्हायला लागेल- वाढती यादवी आणि अधिक हिंसाचार.

विषाणुशास्त्र १०१...

विषाणु हे निसर्गातील वन्य प्राणी आहेत. औषध किंवा लसीला अज्ञात असलेले हे विषाणु जिवंतही नाहीत किंवा निर्जीवही नाहीत.अनुकूल पेशीमध्ये ते प्रतिजैविके बनतात आणि उरलेला काळ ते दगडासारखे मृतावस्थेत पडून असतात. मानवाच्या, वनस्पती किंवा प्राण्यांच्या उत्क्रांतिमध्ये त्यांच्या भूमिकेला आम्हाला झटकून टाकता येणार नाही. विषारी जे असतात ते आमच्यावर हल्ले करतात आणि जे लाभाचे आहेत ते आम्हाला प्रत्येकाला दररोज जिवंत आणि सुदृढ रहायला मदत करतात. इतक्या काळात, आम्ही विषारी विषाणुंसाठी प्रतिकारशक्ति आणि अनुवंशिक प्रतिबंध उत्क्रांत झाला आहे.

माध्यमे लसीविषयक बातम्यांनी भरलेली आहेत, पण लस ही तज्ञाने परिणामकारक औषध नाही, कारण आम्ही इन्फ्ल्यूएंझाच्या प्रकरणात पाहिले आहे त्याप्रमाणे प्रत्येक विषाणुच्या बदलत्या स्वरूपाप्रमाणे नव्या लसीची गरज प्रत्येक मोसमात गरज आहे. पण हे अनावश्यक आहे, कारण मानवतेने, अर्धशतक लढा देऊनही, एचआयव्ही लस तयार करण्यात अपयशी ठरली आहे. जगभरातील डॉक्टर्स, वैज्ञानिक आणि साथरोग तज्ञ कोरोना विषाणुवरील लस या औषध चमत्काराच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. भारताने मूर्खासारखी या लसीची प्रतिक्षा करू नये, जी भारतातील तणावायुक्त परिवर्तनात काम करेल किंवा करणार नाही.

उत्क्रांतिच्या इतिहासापासून धडे घेऊन, कोणत्याही विषाणुच्याविरोधात, कोरोना किंवा इन्फ्ल्यूएंझा असो, मजबूत प्रतिकारशक्ति हाच केवळ दिर्घकालीन संधी आहे.

काहीही असो, लस उपलब्ध नसली तरीही, आम्ही विषाणुवर नियंत्रण मिळवण्यात आणि मृत्युचा दर कमी राखण्यात यशस्वी ठरलो आहोत. आता या कोविड-१९ ची तुलना खरोखरच विषारी असलेल्या क्षयरोगाच्या आजाराशी करू या. प्रतिवर्षी क्षयाने १० लाख ५० हजार लोक मरण पावतात. आम्ही त्यासाठी आमची अर्थव्यवस्था बंद करतो का? नाही. आम्ही काम सुरू ठेवतो आणि चाचणीविना, आमच्या लाखो कामगारांनाही आमच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची परवानगी देतो. कोरोना हा इतरांपेक्षा वेगळा का असावा? क्षयरोग हा प्रत्येक बाबतीत कोरोनाच्या तुलनेत सर्वात भयंकर राक्षस आहे.

परिवर्तनशील संगणक मॉडेलिंगवर अवलंबून असलेले आणि पर्यायी परदेशी वास्तवता फेटाळून लावण्याची ही वेळ आहे. भारताला अधिक प्रागतिक होण्याची गरज आहे.लसीशिवाय आम्ही आजाराला नियंत्रित करण्यात यश मिळवले आहे. आम्ही आमची अर्थव्यवस्था बंद करायला नको आणि नव्याने सुरूवात केली पाहिजे कारण आमची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी इतर पर्यायांची मुदत संपत आहे आणि लवकरच प्रोत्साहनाचा उपयोग होणार नाही आणि आमची आर्थिक निष्क्रियता सुरूच राहिल. लाखो लोकांना कोरोनामुळे नव्हे तर कुपोषण आणि खराब आरोग्यामुळे मरण्यासाठी सोडून दिले जाईल. लहान आणि मध्यम कंपन्यांसाठी मृत्युसूचक घंटा अगोदरच वाजवू लागल्या आहेत. यापुढे आम्हाला लॉकडाऊन करता येणार नाही.

परतीचा मार्ग..

कोरोना हे नवीन वास्तव आहे आणि त्याच्याबरोबर आम्हाला जगायचे आणि काम करायचे आहे. भीतीचे काहीच कारण नाही. कोरोना अत्यंत संसर्गजन्य आहे, यात काही शंका नाही, पण त्यामुळे होणार्या मृत्युचा दर खूप कमी आहे. ही याची रूपेरी बाजू आहे. कोरोनाच्या धोक्याला किरकोळ समजण्याचा हेतू नाही, परंतु दिल्लीतील रस्ते अपघातात मरण पावण्याची शक्यता कोरोनापेक्षा जास्त आहे. कृषि क्षेत्र खूप अगोदरच खुले झाले आहे. याचा अर्थ ७० टक्के भारतीय मजूर काम करत आहेत आणि अर्थव्यवस्था पुन्हा सक्रिय झाली आहे. लहान आणि मध्यम उद्योग तातडीने पुन्हा सुरू करण्याची आम्हाला गरज आहे. भारताला पुन्हा प्रारंभ करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्व राज्यांमध्ये कामाशी संबंधित उपक्रम खुले केले पाहिजेत. काही काळापुरत्या आम्ही फुरसतीच्या काळात केले जाणारे करमणुकीचे उद्योग मर्यादित ठेवू शकतो. परंतु कळीचे आणि गौण आर्थिक उपक्रम सुरू केलेच पाहिजेत. मंदी संपुष्टात आलेली नाही आणि जगाला या संकटाच्या काळात पुरवठा करण्यास तयार असले पाहिजे. ही मेक इन इंडियाचे खरे प्रदर्शन आहे.

वैयक्तिक प्रतिकारशक्ति महत्वाची भूमिका बजावणार असल्याने, सरकारने आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून, लोकांसाठी नियमावली जारी केली पाहिजे. उदाहरणार्थ, व्यक्तिंसाठी किंवा व्यावसायिक आपल्या कामगारांना त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी पुरवू शकत असलेल्या अतिरिक्त जीवनसत्वांचा पुरवठा आणि पूरक आहार याची माहिती द्यावी.

अर्थातच, सर्वात कमकुवत घटक म्हणजे ६५ वर्षांवरील व्यक्तिंचे संरक्षण करण्याचे सरकारवर बंधन आहे. पण जे कमकुवत गटात नाहीत त्यांच्या स्वातंत्र्याच्या सक्षमीकरणाचेही बंधन आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला आपला पर्याय निवडण्याची परवानगी असली पाहिजे-आम्हाला काम करायचे आहे की घरात बंद करून घेऊन मुले, आई आणि पत्नीसोबत उपाशी मरायचे आहे. मी माझ्यासाठी स्वातंत्र्य आणि कामाचा हक्क निवडेन आणि माझे लाखो देशवासी ज्यांना प्रतिष्ठा आणि आपल्या मुलांना भरवण्याचा अधिकार हवा आहे, तेही तेच निवडतील. श्रीमंत किंवा सरकारचा दानधर्म किंवा दया त्यांना नको आहे आणि आपल्या घामाच्या श्रमाने आपले जेवण मिळवण्याची त्यांची इच्छा आहे. म्हणजे, मृत्यु येईल तेव्हा तो त्यांना प्रतिष्ठेने आपल्याबरोबर घेऊन जाईल.

मृत्यु हा सर्व जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे आणि म्हणून त्याला सामोरे जाताना भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला आपल्या जिवलगांची वेदना आणि त्यांच्या नुकसानाची आणि धर्म किंवा त्याप्रति आमचे कर्तव्य बजावण्यातील असमर्थता याबद्दल भीती वाटली पाहिजे. अन्न आणि पाण्यासह पैसा ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आम्हाला काम करण्याची परवानगी दिलीच पाहिजे. यमराज किंवा मृत्यु आणणार्याला त्याला किंवा तिला कुणालाही निवडू द्या, पण त्यादिवसापर्यंत, आम्ही आमचे कुटुंब, आमचे जिवलग आणि आमचे राष्ट्र याप्रति आमचे कर्तव्य निभावत राहू. काम करून आमच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला वर आणण्याचे आमचे कर्तव्य आहे. आम्ही जर ते राखू शकलो, तर आम्ही ज्या प्रकारचे महासत्ता बनायचे आहे, तशी बनू. भीतीचे दिवस संपले आहेत आणि आम्ही सर्व आपले कर्तव्य बजावू या, प्रतिष्ठा,विपुलता आणि आनंदाचे जीवन पुन्हा उभारण्याची वेळ आली आहे.

- इंद्रशेखर सिंग

(संचालक, धोरण आणि व्याप्ती-भारतीय राष्ट्रीय बियाणे महासंघ)

ABOUT THE AUTHOR

...view details