नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली प्रगती बैठक घेतली आहे. प्रगती-म्हणजेच कार्यक्षम प्रशासन आणि प्रकल्पांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठीचे बहुआयामी व्यासपीठ बैठकीत विविध योजना आणि प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला आहे.
प्रगती बैठक: आयुष्मान भारत’ आणि ‘सुगम्य भारत’ अभियानाचा मोदींनी घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिली प्रगती बैठक घेतली आहे.
बैठकीत 'आयुष्मान भारत’ आणि ‘सुगम्य भारत’ या अभियानाचा आढावा घेण्यात आला. तर सर्व राज्यांना पाणी बचत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर २०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्पाचा पुनरूच्चार केला. यासंबधीत कामांना गती देण्यासाठीच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आयुष्मान भारत या योजने अंतर्गत 35 लाख लोकांना रुग्णालयात भरती करण्यात आले असून 16 हजारपेक्षा अधिक लोक या योजनेशी जोडले गेले असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली. यावेळी त्यांनी रेल्वे आणि परिवहन विभागाच्या 8 म्हत्त्वपुर्ण योजनेच्या प्रगती रिपोर्टची समीक्षा केली. या योजने अंतर्गत बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये काम सुरु आहे.