नवी दिल्ली - चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पत्र पाठवले आहे. कोरोना विषाणुमुळे मरण पावलेल्यांप्रती मोदींनी सहानुभूती व्यक्त केली.
कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी भारत चीनसोबत आहे, असे मोदी म्हणाले. वुहानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारतात परत आणताना चीनने मदत केल्याबद्दल मोदींनी जिनपिंग यांचे आभार व्यक्त केले.
कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीयांना विशेष विमानाने भारतात परत आणले आहे. भारतात दाखल झाल्यानंतर त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. हे सर्व नागरिक सुखरुप असून कोणालाही कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
हेही वाचा -निर्भया प्रकरणातील दोषींना अद्यापही फाशी नाही; निर्भयाच्या आईची उद्गविग्न प्रतिक्रिया
कोरोनाचे थैमान : नरेंद्र मोदींचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पत्र, म्हणाले... - Modi has expressed solidarity with Chinese
चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना पत्र पाठवून सवेंदना व्यक्त केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने चीनमध्ये थैमान घातले आहे. येथे मृतांची संख्या तब्बल ८१० झाली आहे. २००३ मध्ये सार्सच्या संसर्गामुळे गेलेल्या बळींचा आकडाही आता कोरोनाने मागे टाकला आहे. चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे डिसेंबरमध्ये सर्वात प्रथम निदर्शनास आले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा आजार तब्बल २५ देशांमध्ये पसरला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
हेही वाचा -अहमदाबाद : सामूहिक विवाह सोहळ्यात 1 हजार 101 जोडपी विवाहबद्ध