नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, यातच दिलासादायक बाब म्हणजे देशातील 17 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकालाही कोरोनाची लागण झाली नाही. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशातील 325 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही. तसेच गेल्या 14 दिवसांमध्ये म्हणजे देशातील 17 राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोना रुग्ण आढळलेला नाही. जर स्थिती अशीच नियत्रंणामध्ये राहिली तर 352 जिल्हे कोरोना मुक्त होतील. त्यानंतर तेथील लॉकडाऊनही हटवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली.'