नवी दिल्ली - राज्यभरात सरकार स्थापनेच्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींना वेगळे वळण मिळाल्याचे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्वीट केले असून, दोन्ही नेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्राच्या फडणवीस व अजित पवार यांच्या भविष्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला आहे.
कालपर्यंत शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याबद्दल तिन्ही पक्षांतील नेते सकारात्मक असल्याचे चित्र होते. परंतु, सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.