'मै भी चौकीदार' व्हिडीओ शेअर करत मोदींकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ - start
मी भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा चौकीदार आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सेवेसाठी, प्रगतीसाठी जो कठोर परिश्रम करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे.
!['मै भी चौकीदार' व्हिडीओ शेअर करत मोदींकडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2707042-674-2831f2f0-ccc1-49c3-a658-0724280fd29a.jpg)
नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मैं भी चौकीदार हू हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आगमी २०१९ लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. देशसेवेसाठी तुमचा चौकीदार उभा आहे, असे ट्वीट मोदींनी केले आहे. मी एकटा नाही तर तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, असा संदेशही या ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
मोदींनी पुढे म्हटले की, मी भ्रष्टाचार, घाण आणि सामाजिक दुष्परिणमांविरूद्ध लढणारा चौकीदार आहे. यासाठी मला तुम्हा सर्वांची आवश्यकता आहे. भारताच्या सेवेसाठी, प्रगतीसाठी जो कठोर परिश्रम करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. मोदींनी ३ मिनिटे ४५ सेकंदाचा हा व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये देशात केलेल्या विकास कामांचा थोडक्यात आढावा घेतला आहे.