महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक - Ghulam Nabi Azad

पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. मात्र ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सॅल्युटही केला. माझ्यासाठी तो क्षण अतिशय भावूक होता असे मोदी म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक
गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक

By

Published : Feb 9, 2021, 12:08 PM IST

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचे चित्र मंगळवारी राज्यसभेत बघायला मिळाले. गुलाम नबी आझाद जम्मु-काश्मीरचे मुख्यमंत्री असताना घडलेल्या प्रसंगाची आठवण सांगताना मोदी भावूक झाले.

गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक

मोदी झाले भावूक

आझाद मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातमधील पर्यटकांवर काश्मीरात हल्ला झाला होता. तेव्हा सर्वप्रथम मला गुलाम नबी आझाद यांचा फोन आला. फक्त माहिती देण्यासाठी त्यांनी फोन नाही केला. तेव्हा त्यांचे अश्रु थांबत नव्हते. आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी तशीच काळजी त्यांनी या नागरिकांविषयी घेतली. ही आठवण सांगताना मोदी भावूक झाले.

आझाद यांना केला सॅल्युट

पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. मात्र ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे असे म्हणत मोदींनी सदनात त्यांना सॅल्युटही केला. माझ्यासाठी तो क्षण अतिशय भावूक होता असे मोदी म्हणाले. दुसऱ्या दिवशीही सर्व जण सुखरूप पोहोचले की नाही याची विचारणा करण्यासाठी त्यांनी फोन केला असे मोदींनी सांगितले. एक मित्र म्हणून मला कायम त्यांच्याविषयी आदर आहे असेही ते म्हणाले.

आझाद यांची उणीव भासेल

गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्या नेत्याला त्यांची उणीव भरून काढणे थोडे कठीण जाईल. कारण गुलाम नबी हे पक्षासोबतच देशहिताकडेही लक्ष द्यायचे असेही मोदी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details