महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हरियाणा विधानसभा: पाकिस्तानला जाणारं पाणी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणणार - पंतप्रधान मोदी - चारखी दादरी मोदी सभा

हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे, मी ते पाणी भारतात अडवेल आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणेल, असे मोदी हरियाणामध्ये म्हणाले.

पंतप्रधान मोदी

By

Published : Oct 15, 2019, 3:44 PM IST

Updated : Oct 15, 2019, 4:07 PM IST

चंदीगड- हरियाणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी ७० वर्षांपासून पाकिस्तानला जात आहे, मी ते पाणी भारतात अडवेल आणि हरियाणातील शेतकऱ्यांच्या घरापर्यंत आणेल. या पाण्यावर भारतातील शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी हरियाणातील चारखी दादरी येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान केले.

शी जिनपिंग यांना हरियाणाती मुलींची कथा असलेल्या दंगल चित्रपटाचे कौतुक केल्याचे मोदी म्हणाले. नुकतेच शी जिनपिंग भारतात आले असता त्यांनी 'दंगल' चित्रपटाचे कौतूक केले. या चित्रपटाचे कौतुक ऐकून मला हरियाणाचा खूप अभिमान वाटला, असे मोदी म्हणाले. बेटी बचावो, बेटी पढाओ अभियानाला हरियाणातील खेड्यांनी प्रतिसाद दिला नसता तर त्याची फळं आज मिळाली नसती. आता हरियाणातील प्रत्येकजण ' म्हारी छोरीया छोरो से कम है क्या' असे म्हणत आहे.

यावर्षी आपण सर्वजण दोन प्रकारच्या दिवाळी साजरी करणार आहोत. एक म्हणजे मातीच्या दिव्यांची दिवाळी, आणि दुसरी म्हणजे कमळाची दिवाळी. ही दिवाळी आपण मुलींच्या विजयाची दिवाळी म्हणून साजरी करायला हवी, असे मोदी म्हणाले. हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा राज्यात जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यामध्ये मोदींच्या चार जंगी सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील दोन सभा आज राज्यातील चारखी दादरी आणि कुरुक्षेत्र येथे होणार आहेत. तर शेवटची सभा हिसार येथील जाट बहुल भागामध्ये १८ ऑक्टोबरला होणार आहे.भाजपने 'म्हारो सपनो का हरियाणा' म्हणजेच माझ्या स्वप्नातील हरियाणा या नावाने निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. यामध्ये हरियाणा स्टार्टअप मिशन, युवा विकास आणि रोजगार मंत्रालयाची स्थापना, राज्यासाठी एक ऑल इंडिया मेडिकल इस्टिट्यूट(एम्स) आणि २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासने दिले आहे.
Last Updated : Oct 15, 2019, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details